दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी, फ्रँकफर्टमध्ये इमर्जन्सी लँडिंग



दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइट UK17 ला बॉम्बची धमकी देण्यात आली असून या विमानाचे फ्रँकफर्टमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या 'विस्तारा' विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर ते फ्रँकफर्टच्या दिशेने वळवण्यात आले असून इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. पण, तपासादरम्यान विमानात काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर विमान लंडनला पाठवण्यात आले आहे. तसेच विमान फ्रँकफर्ट विमानतळावर सुरक्षितपणे उतरले होते आणि अनिवार्य तपासणी केली गेली होती. 18 ऑक्टोबर रोजी दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइट क्रमांक 'UK17'ला सोशल मीडियावर सुरक्षेची धमकी मिळाली होती. वैमानिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून फ्लाइट फ्रँकफर्टकडे वळवले.

 

विमानांमध्ये बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या सातत्याने मिळत असून गेल्या काही दिवसांत, भारतीय विमान कंपन्यांच्या सुमारे 40 विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या, परंतु नंतर हे सर्व खोटे असल्याचे सिद्ध झाले. विमान कंपन्यांना बॉम्बच्या खोट्या धमक्या मिळण्याच्या घटना रोखण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालय कठोर नियम लागू करण्याची योजना आखत आहे.  



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top