मुंबई : रॅगिंग करणारे दोन एमबीबीएस विद्यार्थी निलंबित



मुंबईतील ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांना मद्यधुंद अवस्थेत आणि ज्युनिअरशी रॅगिंग केल्याप्रकरणी एका वर्षासाठी वसतिगृहातून निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती एका अधिकारींनी शुक्रवारी दिली.

 

मिळालेल्या माहितीनुसार प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाल्यानंतर या आठवड्यात वैद्यकीय महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील वसतिगृहात ही घटना घडली असून आरोपी विद्यार्थ्यांनी नशेत असताना एका नवीन विद्यार्थ्याला जबरदस्तीने 'डान्स' करण्यास सांगितले व त्याची रॅगिंग केली.

 

तसेच ही घटना गुरुवारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग समितीच्या निदर्शनास आणून देण्यात असून ज्यांनी दोन विद्यार्थ्यांना वसतिगृहातून एका वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.   



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top