पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटार सायकल चोरी करणा-या आरोपीकडून केला लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोटार सायकल चोरी करणा-या दोन आरोपीकडून अंदाजे १० लाख ७० हजार रू किंमतीच्या १८ मोटर सायकली मुद्देमाल हस्तगत

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,सोलापुर ग्रामीण अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या सुचनेप्रमाणे सोलापुर जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीस प्रतिबंध करण्याच्या आदेशानुसार पंढरपूर विभागाचे सहा पोलीस उपअधिक्षक डॉ अर्जुन भोसले पंढरपूर, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुरुनं ६४१/२०२४ बीएमएस ३०३(२) प्रमाणे दि.२८/०८/२०२४ रोजी फिर्यादी गौरव उमेश गायकवाड वय ३५ वर्षे सरगम चौक पंढरपूर हे आहिल्या हॉटेल मार्केट यार्ड समोर मोटार सायकल पार्किंग करून जेवण पार्सल आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेले असता त्यांची होन्डा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल कोणी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.

सदर मोटारसायकल बाबत गुप्त बातमीदारा मार्फत बातमी काढून आरोपी लखन शिवराय लोहार आळंदी रोड साई कॉम्प्लेकची पुणे १५ जि.पुणे हा भटुंबरे गावामध्ये आल्याचे माहिती मिळाल्याने,दि.०५/१०/२०२४ रोजी दुपारी सदर आरोपीस सापळा रचून गुन्हे प्रकटीकरण शाखा पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांनी पकडलेल्या सदर आरोपींकडे दाखल गुन्ह्याबाबत चौकशी करता त्याने पंढरपूर शहरातून तसेच पुणे शहर,पिंपरी चिंचवड, सोलापूर शहर येथील एकूण १८ मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यांची किंमत अंदाजे १० लाख ७० हजार रू अशी आहे.आरोपी लखन शिवराय लोहार आळंदी रोड साई कॉम्प्लेक्स दिघी पुणे जि.पुणे,विनोद बळीराम घुले रा.कल्पना नगर कळंब ता.कळंब जि.धाराशीव यांच्याकडून मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.या दाखल असलेल्या गुन्ह्याची आरोपींनी कबुली दिली.

सदरची कामगिरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ.अर्जुन भोसले,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अशिष कांबळे,स.पो.फौ.राजेश गोसावी,स.पो.फौ. नागनाथ कदम, स.पो.फौ. शरद कदम,पो.ह.बिपीनचंद्र ढेरे,पो.ह.सुरज हेंबाडे, पो.ह.सिरमा गोडसे,पो.ह. नितीन पलुसकर, पो.ह.सचिन हेंबाडे, पो.ह.नवनाथ माने, पो.कॉं. शहाजी मंडले,पो.कॉं.समाधान माने, पो.कॉ. बजरंग बिचुकले, पो.कॉं निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीण चे पो.शि.रतन जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top