केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांची भेट घेऊन केली प्रकृतीची चौकशी
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.7 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज बॉलिवूड चे सुप्रसिद्ध सिने अभिनेते माजी खासदार गोविंदा यांची जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गोविंदा यांना त्यांच्याच पिस्तुलमधून मिसफायर होऊन पायाला गोळी लागली होती. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यावर ते आता घरी विश्राम करीत आहेत.

त्यांच्या प्रकृतीची ना.रामदास आठवले यांनी भेट घेऊन चौकशी केली.ना.रामदास आठवले यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांचा आशिर्वाद कायम माझ्या पाठीशी असून आज माझी भेट घेतल्याबद्दल मी खूप समाधानी झाल्याचे सुपरस्टार गोविंदा यांनी सांगितले.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे हेमंत रणपिसे राजेश गाडे, सुनील पवार ,प्रविण मोर आदी मान्यवर उपस्थित होते.