हरियाणानंतर महाराष्ट्रात काँग्रेस सक्रिय, राहुल गांधी दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर



हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला असून आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे महाराष्ट्रात येणार आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्याचवेळी राहुल गांधी निवडणूक प्रचारासाठी 4 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर या दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणही करणार आहे. याशिवाय इतर कार्यक्रमातही ते सहभागी होणार आहे.  

 

मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात राहुल गांधी अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहे. सर्व प्रथम शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी कोल्हापूरला भेट देणार आहे. यानंतर सायंकाळी ते बावडा शहरातील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. काही खास सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभागी होणार आहे.

 

दुसऱ्या दिवशी 5 ऑक्टोबर रोजी राहुल गांधी कोल्हापूरचे दिवंगत समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीला भेट देतील आणि त्यांना आदरांजली वाहतील. त्यानंतर ते 1000 प्रमुख राजकीय नेते, स्वयंसेवी संस्था, धार्मिक गट आणि इतर प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान संविधान परिषदेत सहभागी होतील. याशिवाय ते जनतेला संबोधित करून बोलणार आहे.

Edited By- Dhanashri Naik 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top