गौरी आगमन हे स्त्रीशक्तीचे ,सृजनाचे आणि नवीन निर्मितीचे शक्तिस्थान मानले
पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०९/२०२४- गौरी आवाहना निमीत्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार वाधेश्वर नगर, वाघोलीत विधानपरिषद उपसभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी पंधरा लाडक्या बहिणींशी संवाद साधला.नुरजहा सूर्वे,अनिता गालफाडे,मालम चौगुले, अर्चना मोहिते,अर्चना मदने,पूजा पात्रे, कविता काळे,पौर्णिमा पात्रे,शोभा पात्रे, अस्मिता राजगुरू,मोना मोहिते,रेशमा क्षिरसागर,प्रियांका अल्हाट,नीलम पवार, मंगल थोरात या महिलांशी बोलुन समज़ुन घेतले.
पतीला वाटत नव्हते खरेच पैसे मिळतील
आता काय म्हणतात ?

मुलांच्या शिक्षणाला हातभार लागतोय
कोणी योजना आणली ?
मुख्यमंत्री यांनी
मुख्यमंत्री कोण आहेत ?
एकनाथ शिंदे साहेब
योजना झाली,आता काय वाटते ?
एवढे केले तेच भरपुर झालेय
अशी प्रश्नोत्तरे झाली.

यानंतर पत्रकारांशी बोलतांना विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या की ,महिला सक्षमीकरणाचा पुढचा पल्ला अजून खूप आव्हानात्मक आहे.मोठ्या प्रमाणात सुरक्षेसाठी कायद्याची अंमलबजावणी ची यंत्रणा उभी करण्याचा संकल्प विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी आज गौरी आगमनाच्या निमीत्ताने केला.या कामांमध्ये आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्णतः सहकार्य मिळेल अशी देखील त्यांनी खात्री व्यक्त केली.

यावेळी शिवसेना पुणें शिरूर लोकसभा महिला संपर्कप्रमुख सारिका पवार,महिला जिल्हा प्रमुख मनिषा पलांडे व वाघोली ग्रामस्थ उपस्थित होते.