केदारनाथ मध्ये भाविकांचा दुर्दैवी मृत्यू!



केदारनाथच्या घाटी मध्ये सोमवारी मुसळधार पावसामुळे दरड कोसळली.या मध्ये पाच भाविकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना जखमींना गुप्तकाशी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

मृत आणि जखमींमध्ये नेपाळ, गुजरात, मध्यप्रदेशच्या यात्रेकरूंचा समावेश आहे. केदारघाटी येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या भूस्खलनामुळे पाच यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या भाविकांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी आणखी चार यात्रेकरूंचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. जिल्हा प्रशासन पोलीस आणि एसडीआरएफचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. 

या ढिगाऱ्याखाली दबून मध्यप्रदेशातील एका भाविकाचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. केदारनाथचे दर्शन करून हे भाविक परत येत असताना हा अपघात झाला. माहिती मिळताच एसडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक लोकांनी पाऊस असूनही बचावकार्य सुरू केले. यावेळी ढिगारा हटवून चौघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले

Edited by – Priya Dixit 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top