द.ह.कवठेकर प्रशालेच्या यशात अजून एक मानाचे पान
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथील द.ह. कवठेकर प्रशालेत शिकणाऱ्या आदर्श अशोक कुलकर्णी इयत्ता दहावी ड या विद्यार्थ्याला मेजर ध्यानचंद क्रीडा रत्न हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो.२९ आॕगस्ट हा हाॕकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन .त्यांच्या स्मरणार्थ हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. या विशेष पुरस्कारासाठी पंढरी नगरीतील विद्यार्थ्याची निवड झाल्याबद्दल पंढरपूर एज्युकेशन सोसायटी चे मानद सचीव सुधीर पटवर्धन सर ,अध्यक्ष नाना कवठेकर , प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी सर, उपमुख्याध्यापक नृ.बा.बडवे सर,जेष्ठशिक्षक र.शि.कुलकर्णी सर, त्याचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक यांनी चि.आदर्श कुलकर्णी याचा प्रशालेतर्फे सत्कार करत भावी कारकिर्दीसाठी शुभाशीर्वाद दिले.
