लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या खात्यातून विविध चार्जेसच्या नावाखाली बँका काही रक्कम कपात करून घेत आहेत -पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष दिगंबर सुडके
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या खात्यातून बँक चार्जेस,सर्विस चार्जेस, मेन्टेनन्स चार्जेस नावाखाली बँका काही रक्कम कपात करून घेत आहेत.
ही बाब लक्षात घेऊन पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन चर्चा करून सर्व रक्कम लाभार्थ्यांना मिळवण्याची व्यवस्था करावी, कपात झालेल्या बँक खात्यातील रक्कम लाभार्थ्यांना परत मिळावी, केवायसीसाठी अतिरिक्त काउंटर चालू ठेवून लाभार्थ्यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना याबाबत निवेदन दिले आहे.यावेळी मा.उपनगराध्यक्ष इब्राहिम बोहरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे आदी उपस्थित होते.