खरंच मी नशिबवान…राजसाहेब ठाकरे स्वतः आले याला म्हणतात दैवयोग..

खरंच मी नशिबवान…राजसाहेब ठाकरे स्वतः आले….याला म्हणतात दैव योग..

साहेब तुमचे उपकार कधीच फेडू शकत नाही..

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – माझ्या पंढरपूर मधील पण पुण्यातील सर्व मित्र मैत्रिणींनी माझ्या वाढदिवसानिमित्त हॉटेल J W Marriot सेनापती बापट मार्ग पुणे या पंचतारांकित हॉटेलमध्ये सन्मान आणि स्नेहभोजन आयोजित केले होते.

शुक्रवारी रात्री मी राजसाहेबांना भेटण्यासाठी बीड ला गेलो होतो. त्यावेळी मी साहेबांना सांगितले होते की साहेब मी आत्ता पुण्याला चाललो आहे कारण माझ्या कॉलेज च्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनी हॉटेल J w marriot पुणे येथे माझा सन्मान ठेवला आहे.साहेब मला म्हणाले सांभाळून जा आणि पोचला की फोन कर .

शनिवारी नियोजित कार्यक्रम सुरु झाला. गप्पा सुरु असताना माझे सर्व मित्र म्हणत होते की दिलीप आम्हाला राज साहेबांना भेटायचं आहे फोटो काढायचा आहे.

सन 1992 पासून ची आमची इच्छा आहे. 1992 पासून माझ्या या सर्व मित्रांना बरोबर घेऊन पंढरपूर येथे त्यावेळचे पंढरपूर कॉलेज आताचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या कॉलेजवर भारतीय विद्यार्थी सेनेची शाखा काढली होती आणि मी कॉलेज प्रमुख झालो होतो.

या सर्व मित्रांनी त्यावेळी झालेल्या कॉलेजच्या निवडणुकीमध्ये मला निवडून आणले होते आणि माझ्या आयुष्यातील राजकीय जीवनाची विजयी सुरुवात त्यावेळेपासून झाली होती.त्यावेळी आम्ही Bsc ला होतो.

त्यावेळीपासून हे सर्व माझे मित्र राज साहेब ठाकरे यांचे समर्थक आहेत आणि त्यांची इच्छा होती की राजसाहेब ठाकरे यांना भेटायची.

मी मित्रांना सांगत होतो की साहेब लवकरच पंढरपूर ला येणार आहेत त्यावेळी आपण साहेबांना भेटू.

पण काय या सर्व गप्पा सुरु असताना देवाच्या मनात आले आणि साक्षात राजसाहेब ठाकरे हॉटेल J W marriot वर आले. आम्हाला आश्चर्याचा धक्कांच बसला. साहेब आले माझ्या सर्व मित्रांना भेटले, त्यांची विचसारपूस केली आणि फोटोही काढले आणि सर्वांची मनात असलेली इच्छाही पूर्ण केली.
याला म्हणतात नेता.. नेता असावा तर राजसाहेब ठाकरे यांच्या सारखा…

धन्यवाद साहेब..
दिलीप बापू धोत्रे ,मनसे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top