स्वेरीच्या ९ विद्यार्थ्यांची विप्रो पारी प्रा.लि.कंपनीत निवड

स्वेरीच्या ९ विद्यार्थ्यांची विप्रो पारी प्रा.लि.कंपनीत निवड

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज– विप्रो पारी प्रा.लि. या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील ९ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

विप्रो पारी प्रा.लि. या नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून अमित अभिमन्यू पाटील,गोविंद ज्ञानेश्वर पवार, अभिजित विकास खुळे, अर्जुन विजयकुमार पाटील, आशुतोष दर्लिंग माने, अविष्कार गोरख उबाळे,रितेश गणेश चव्हाण, शिवराज तानाजी मगर, यश राजेश बागेवाडीकर या ९ विद्यार्थ्यांची निवड केली. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी वार्षिक रु.३.८ लाखांपर्यंतचे पॅकेज मिळाले आहे.

या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देशात तसेच विदेशातही काम करण्याची संधी मिळणार आहे. या कंपनीने आजपर्यंत २५ पेक्षा जास्त देशांत आपल्या सर्व्हिसेस दिल्या आहेत. १९९८ साली स्थापन झालेल्या स्वेरी अभियांत्रिकी मधून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.

सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व संबंधित विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे,संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार,उपप्राचार्य डॉ.मिनाक्षी पवार, स्वेरी अंतर्गत इतर महाविद्यालयांचे प्राचार्य,अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top