येत्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट



गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पालघरमध्ये आज,मुसळधार पावसासाठी ऑरेंज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय रायगड आणि ठाण्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत मान्सूनचा पाऊस साधारणपणे हलका ते मध्यम असेल पण आज रविवार 4 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

 
पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) हाय टायड अलर्ट जारी केला आहे. 

भारतीय हवामान खात्याने (IMD) पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये 6ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार तासांत पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि साताऱ्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

 

5 ऑगस्टपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरात भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे, कोल्हापूर, साताऱ्यातील अनेक भागात अतिमुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Edited by – Priya Dixit  

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top