महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांची नावे बदलण्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. याआधीही 7 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नामांतराच्या विरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती.
आता औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबाद धारावी नावानेच कायम ओळखले जाणार .नामांतरणाच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा नकार सुप्रीम कोर्टाने दिला आहे. नाव बदलण्याचे अधिकार राज्य सरकारचे असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
राज्य सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. नामांतराच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली असून याचिका मुंबई न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच राज्य सरकार कडून घेण्यात आलेला निर्णय योग्य आहे असे न्यायालयाने निर्णय दिले.
याचिकाकर्त्यांनी मुंबई न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली असून आज सर्वोच्च न्यायालयाने त्या याचिकांवर निर्णय देत याचिका फेटाळून लावली आहे.
Edited By- Priya Dixit