जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती येथे परसबाग उपक्रम
शेळवे /संभाजी वाघुले – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना उपक्रम राबविण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत.ज्यायोगे विद्यार्थ्यांमध्ये परसबागेविषयी आवड निर्माण होईल.त्यामुळे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती या ठिकाणी परसबाग उपक्रम राबविण्यात आला .
या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांनी व तसेच शिक्षकांनी परिश्रम घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती येथे परसबाग निर्माण केलेली आहे. यामध्ये वांगी, मिरची, कोबी, टॊमॅटो,कढीपत्ता,कोथिंबीर, पालक, गवार अशा वेगवेगळ्या भाजीपाल्यांची लागवड करून परसबाग फुलवली आहे.
या उपक्रमाला पालक,शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला कारण या औषधे फवारणी करून पिकविलेल्या भाजीपाल्यापेक्षा परसबागेतील भाजीपाला निश्चितच आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.