अध्यापक विद्यालय, पंढरपूर येथे नवीन डी.एल्.एड. प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – दि.26/7/2024 रोजी अध्यापक विद्यालय, पंढरपूर येथे नवीन डी.एल्.एड. प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ घेण्यात आला .
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सदस्य तथा कवठेकर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक एस.पी. कुलकर्णी सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.आर. वाघमारे हे होते.

नवीन विद्यार्थ्यांचा स्वागताचा कार्यक्रम द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून यशस्वीरित्या पार पाडला.नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत पेन व गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.या कार्यक्रमाचा समारोपप्रसंगी अल्पोपहार देऊन करण्यात आला.
हा स्वागत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यापक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.