महाराष्ट्र-गुजरात राज्यांमध्ये पावसाचा कहर, महाराष्ट्रातील या भागात IMD चा अलर्ट


rain
देशात सर्वत्र पावसाने झोडपले आहे. आज 28 जुलै रोजी महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेशाच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 

 

देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक भागात पूरसदृश्य स्थिती झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज काही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

आज मुंबई, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भाला IMD ने अलर्ट जारी केला असून हवामान खात्यानं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिह्यात, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला, नाशिक, चंद्रपूर, आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

मराठवाड्यात बीड, जालना, परभणी, छत्रपतीनगर भागात मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. 

पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. पुण्यात पूरसदृश्य स्थिती झाली असून रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 

नागरिकांनी आवश्यक असल्यास घरातून बाहेर पाडण्याचे आवाहन प्रशासन कडून करण्यात आले आहे. 

 

Edited by – Priya Dixit  

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top