पालघर येथे अल्पवयीन विद्यार्थिनींची स्वतःला पेटवत आत्महत्या



पालघर येथे एका आदिवासी शाळेत इयत्ता 11 वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने शाळेच्या गच्चीवर जाऊन स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या मुलीने हे पाऊल का उचलले अद्याप हे समजू शकले नाही. 

सदर घटना पालघर जिल्ह्यात आदिवासीबहुल जोहर तालुक्यात एका निवासी शाळेत मंगळवारी घडली आहे. 17 वर्षीय अल्पवयीन विध्यार्थीनी 11 वीत शिकत होती. दुपारी ती देहरे आश्रम शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील गच्चीवर गेली आणि तिने स्वतःवर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवले.

हे पाहतातच गोंधळ उडाला,लोकांनी तिला पेटलेले पाहून धावत घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. तो पर्यंत ती होरपळली होती. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरु केला आणि मृतदेह ताब्यात घेतले.या मुलीने हे पाऊल का उचलले अद्याप कळू शकले नाही. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 

Edited By- Priya Dixit 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top