Swati Maliwal : बिभव कुमार 30 जुलै रोजी न्यायालयात हजर,आरोपपत्र दाखल



स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय बिभव कुमार यांच्याविरुद्ध तीस हजारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

यादरम्यान बिभव कुमार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केले . बिभव कुमार यांच्याविरुद्ध कोर्टाने आरोपपत्रावर समन्स बजावले. न्यायालयाने दिल्ली पोलिसांना बिभव कुमारला 30 जुलै रोजी हजर करण्याचे निर्देश दिले.

आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती पालीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा आरोप विभव कुमार यांचावर असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी तीस हजारी न्यायालयात 1000 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून विभव कुमारला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 30 जुलै रोजी विभव कुमारला न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहे. न्यायालयाने विभव कुमारच्या न्यायालयीन कोठडीत 30 जुलै पर्यंत वाढ केली आहे. 

 

 Edited by – Priya Dixit 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top