राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या शुभेच्छा
मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेची मुख्य सचिव म्हणुन निवड करण्यात आली आहे. सुजाता सौनिक यांची मुख्य सचिव म्हणुन निवड आज करण्यात आली आहे.
श्रीमती सुजाता सौनिक यांनी आतापर्यंत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. १९८७ च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत.श्रीमती सुजाता सौनिक यांची निवड झाल्याबद्दल विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. त्याचबरोबर डॉ.गोऱ्हे यांनी महिलांना प्रशासनाच्या सेवेत मुख्य पदावर महिलाचे निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील आभार मानले आहेत.