श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकाकडून 15 लाख 91 हजार किंमतीचे दोन सोन्याचे हार अर्पण
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.5 :- मौजे कुंजीरवाडी,ता.हवेली येथील भाविक बबन रामचंद्र तुपे यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठलास चार पदरी व श्री रुक्मिणी मातेस पाच पदरी असे दोन सोन्याचे हार अर्पण केले आहेत. हाराचे एकूण वजन 249 ग्रॅम असून त्याची किंमत15 लाख 91 हजार 110 इतकी आहे.
यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने बबन रामचंद्र तुपे यांचा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी देणगीदार बबन रामचंद्र तुपे यांचे कुटुंबीय व मंदिर समिती विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.