धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माढा मतदारसंघातील विजयाने मतदारांच्या अपेक्षा वाढल्या
अकलूज /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातून ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आलेले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील विजय झाले आहेत .या विजयानंतर जिल्ह्यात माळशिरस, माढा ,करमाळा, सांगोला, अकलूज, पंढरपूर येथे विजयी जल्लोष करण्यात आला. जेसीबीच्या माध्यमातून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या आनंदात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी झाले होते.
माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना एकूण सहा लाख ३८ हजार ५०० मते मिळाली असून भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाच लाख १४ हजार मते मिळाली आहेत धैर्यशील मोहिते पाटील हे एक लाख ३९ हजार ८०० मतांनी विजयी झाले आहेत.

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मोठ्या विजयाने माढा मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आता तरी या मतदारसंघासाठी अनेक चांगले बदल होऊ शकतील अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे नक्कीच विजय होतील अशी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य विश्वास व्यक्त करीत होते त्याप्रमाणे या गोष्टी घडल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत.