मुंबई — (सखाराम कुलकर्णी)महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र भूषण रामकृष्ण गवई यांची भारताच्या
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र विधानमंडळा तर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
सदरील सत्कार विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात . ना.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते सत्कार समारंभ पार पडला. प्रसंगी विधिमंडळाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती मा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, मा. ना.रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती निलम गो-हे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, यांच्यासह सर्व मंत्री, राज्यमंत्री, वि.स.स./ वि.प.स. सदस्य व अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी सभागृहामध्ये पुज्य भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो विपश्यनाचार्य संस्थापक अध्यक्ष भिक्खु संघ युनायटेड बूध्दीष्ठ मिशन उपाध्यक्ष जागतिक बौध्द संघटन, व अनु. जाती/जमाती / विजा-भज /इ.मा.व./वि.मा.प्र. शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना, मंत्रालय, महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष भारत वानखेडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सुबोध भारत, संजय विष्णू कांबळे, सतीश साबळे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.तसेच राज्यातील मागासवर्गीय अधिकारी / कर्मचारी यांच्या पदोन्नती मधील आरक्षणा संदर्भात संघटनेचे राज्याध्यक्ष भारत वानखेडे व संघटनेचे पदाधिकारी यांनी माजी सामाजिक न्याय मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ असलेले प्रलंबीत प्रकरण निकाली काढण्यात यावे अशी सरन्यायाधीश महोदय यांना विनंती करण्यात आली.
तसेच त्याबाबतचे संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले.