Maharashtra Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे म्हणाले की त्यांनी विनोदी अभिनेता कुणाल कामरा यांच्या 'देशद्रोही' वक्तव्याबद्दल त्यांच्याविरुद्धची विशेषाधिकार सूचना स्वीकारली आहे. या संपूर्ण प्रकरणात कामराने माफी मागण्यास नकार दिला आहे. यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि स्वतः एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, प्रत्येकाला व्यंग्य करण्याचा अधिकार आहे, परंतु शिष्टाचार देखील राखला पाहिजे. प्रत्येक कृतीला प्रतिक्रिया असतेच असे शिंदे म्हणाले होते.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते….
महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे म्हणाले की त्यांनी विनोदी अभिनेता कुणाल कामरा यांच्या 'देशद्रोही' वक्तव्याबद्दल त्यांच्याविरुद्धची विशेषाधिकार सूचना स्वीकारली आहे. या संपूर्ण प्रकरणात कामराने माफी मागण्यास नकार दिला आहे. यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि स्वतः एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, प्रत्येकाला व्यंग्य करण्याचा अधिकार आहे, परंतु शिष्टाचार देखील राखला पाहिजे. प्रत्येक कृतीला प्रतिक्रिया असतेच असे शिंदे म्हणाले होते. सविस्तर वाचा…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाण्यानंतर वादात सापडलेल्या विनोदी कलाकार कुणाल कामरावर पोलिसांनी पकड घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. खार पोलिसांनी दुसरे समन्स जारी केले आहे आणि कामरा यांना 31 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. सविस्तर वाचा.....
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एका न्यायालयाने 2021 मध्ये एका महिलेवर झालेल्या वादानंतर हल्ला करणाऱ्या तसेच विजयकुमार यादवराव इंजे, दिलीप यादवराव इंजे, मुकिंद दिलीप इंजे, ज्ञानेश्वर विजयकुमार इंजे (सर्व रहिवासी औसा तहसीलमधील यकटपूर) या चार दोषींना पीडितेला तिच्या उपचारांसाठी 2हजार रुपये भरपाई देण्याचे निर्देश दिले.सविस्तर वाचा.....
महाराष्ट्रात उष्णतेची लाट वाढत आहे. कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी एक परिपत्रक जारी केले आहे..सविस्तर वाचा.....
नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्यात परिसरात एक ह्र्दयद्रावक घटना घडली. जिथे एका वडिलाना आपल्या मुलीच्या छेडछाडीच्या निषेध केल्याबाबद्दल मोठी किंमत मोजावी लागली काही गुन्हेगार एका तरुणीची छेड काढत होते जेव्हा वडिलांनी याचा विरोध केल्यावर आरोपींनी तरुणीच्या वडिलांची भर रस्त्यावर निर्घृण हत्या केली. नरेश वालदे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ..सविस्तर वाचा.....
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा एका नवीन अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेने कामरा यांच्याविरुद्धची विशेषाधिकार भंगाची नोटीस स्वीकारली आहे. या नोटीसमध्ये उद्धव ठाकरे गटातील शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचेही नाव आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे म्हणाले की, 'देशद्रोही' हा शब्द वापरल्याबद्दल कुणाल कामरा यांच्याविरुद्धची विशेषाधिकार उल्लंघनाची सूचना त्यांनी स्वीकारली आहे आणि ती विशेषाधिकार समितीकडे पाठवली आहे. ..सविस्तर वाचा…..