मुंबईत ऑस्ट्रेलियन नौदलाच्या महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, ड्रायव्हरला अटक


arrest
मुंबईतील साऊथपोर्ट भागात ऑस्ट्रेलियन नौदलाच्या महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. सदर घटना शनिवारी रात्री 11: 30 वाजता मुंबईच्या पोस्ट ट्रस्टच्या ग्रीनगेटवर घडली.

ALSO READ: शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्याने रस्त्याच्या मधोमध माजी नगरसेवकाला मारहाण केली, गैरवर्तन केल्याचा आरोप
शनिवारी तिने जहाजावर येण्यासाठी एक वाहन भाड्याने घेतले. आरोपी वाहनचालकाने तिला अयोग्यरीत्या स्पर्श केले.तिने जहाजावरील सहकाऱ्यांना या घटनेबद्दल सांगितले नंतर पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. 

ALSO READ: जर घरे पाडली तर आम्ही घरात घुसून मारहाण करू, नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नरेंद्र पाटील यांचा इशारा
हे प्रकरण यलोगेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत रविवारी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आरोपी वाहन चालकाला अटक केली. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 74 अंतर्गत महिलेवर हल्ला केल्याबद्दल आणि तिचा विनयभंग केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

सोमवारी आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Edited By – Priya Dixit

ALSO READ: कुणाल कामरा जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्याला सोडणार नाही शिवसेना नेते संजय निरुपम यांची टीका



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top