सौंदणे येथे मागेल त्याला विनामुल्य पाणी हा स्तुत्य उपक्रम तरुणांनी केला सुरू
सौंदणे ता.मोहोळ / ज्ञानप्रवाह न्यूज: सौंदणे तालुका मोहोळ येथे मागेल त्याला पाणी हा उपक्रम तरुणांनी विनामुल्य सुरू केला आहे.
मागील दोन वर्षात कमी झालेले पर्जन्यमान यामुळे जिल्ह्याची वर्धनी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नव्हते.त्यातच चालू वर्षी विहीर कुपनलिका या अपुऱ्या पावसामुळे कोरड्या पडल्या आहेत.उजनी धरण मायनसमध्ये गेलेले आहे.यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.शेतातील पिकं पाण्याअभावी जळत आहेत.तर दुसरीकडे घरगुती व जनावरांच्या पाण्यासाठी प्रश्न गंभीर बनला आहे .

त्यामुळे सौंदणे ता.मोहोळ या गावातील तरुणांनी एकत्रित येऊन मागेल त्याला विनामुल्य पाणी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. कोणालाही मागेल त्यावेळेस त्यांच्या सोयीनुसार पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.बराचसा मजूर वर्ग दिवसभर कामासाठी बाहेर जात असतो.ते संध्याकाळी घरी परत येतात त्यावेळी त्यांना पाणी पुरवले जात आहे.महिला वर्गाची यामुळे पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे. सौंदनेतील कामगार वर्ग, महिला वर्गातून मागेल त्याला विनामुल्य पाणी तरुणांच्या उपक्रमामुळे समाधान व्यक्त केले आहे.सर्वांना टँकरद्वारे दिवसा व रात्री उशीर पर्यंत पाणीपुरवठा केला जातो.

सौंदणे गावात पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे आम्ही मागेल त्याला पाणी चालू केले आहे.ज्यांना पाणी नाही अशा लोकांनी संपर्क साधावा असे आवाहन अमोल माळी,प्रकाश कोकाटे, चांद पठाण यांनी केले आहे.
सौंदणे परिसरातील सर्व युवकांनी पुढाकार घेऊन पाणी वाटप चालू केले आहे .याप्रसंगी सिताराम जाधव, डॉ विक्रम पाटील, प्रकाश माने,सचिन भानवसे,सागर माने,संदेश महाराज माने, सुहास सातपुते,ज्ञानेश्वर माने साहेब, विष्णुपंत भानवसे, दगडू माने या साठी प्रकाश कोकाटे,चांद पठाण यांनी विशेष प्रयत्न केले आहेत .गावातील सर्व ग्रामस्थांनी या कार्याबद्दल कौतुक केले असून आभार व्यक्त करत सहकार्य करणार असल्याचे सांगितले.