श्रीनाथ चौक तरुण मंडळ डीए ग्रुप तर्फे छत्रपती शिव जन्मोत्सव 2025 थाटामाटाने संपन्न
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर येथे बुधवार दि.19/ 2 /2025 रोजी छत्रपती शिवजयंती सोहळा मोठ्या थाटामाटाने व शिवगर्जनेसह उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि मंडळाचे उपाध्यक्ष युवराज रेवडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्रीनाथ चौक तरुण मंडळाचे जेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व डी ए ग्रुपचे शिवभक्त उपस्थित होते.

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्रीनाथ चौक तरुण मंडळ डीए ग्रुप च्यावतीने नेत्र तपासणी व नेत्र उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचा पंढरपुरा तील साडेतीनशेहुन अधिक नागरिकांनी लाभ घेतला.यामध्ये वृद्धाश्रम, बेघर व अनाथाश्रम येथील सर्व गरजू वृद्धांना डी ए ग्रुप तर्फे तपासणी व उपचार करून भोजन व्यवस्थे सह ने आण करण्याकरिता रिक्षाची व्यवस्था करण्यात आली होती अशी माहिती श्रीनाथ चौक तरुण मंडळ डीए ग्रुपचे आधारस्तंभ ऋषिकेश दत्तात्रय आदापुरे यांनी दिली.

हा शिवजन्मोत्सव सोहळा व नेत्र तपासणी शिबिर पार पाडण्यासाठी डी ए ग्रुप व मंडळातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी हे शिबिर यशस्वी संपन्न झाले.