गोदामहाआरतीने फिटले नेत्राचे पारणे
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर आणि काळाराम मंदिर येथे घेतले दर्शन

नाशिक/ ज्ञानप्रवाह न्यूज,३ फेब्रुवारी : विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने रामकुंड पंचवटी येथे गोदामहाआरती केली. गंगामाईच्या पूजनाने त्यांनी धार्मिक श्रद्धा व्यक्त केली आणि नदी स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

यानंतर डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर आणि काळाराम मंदिर येथे दर्शन घेतले.त्यांनी मंदिरात विधीवत पूजा केली आणि राज्याच्या प्रगती व जनकल्याणा साठी प्रार्थना केली.

विशेष म्हणजे, मंदिर व्यवस्थापन आणि कामकाजावरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.मंदिराच्या स्वच्छता, भाविकां साठी उपलब्ध सोयीसुविधा आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत त्यांनी व्यवस्थापनाशी चर्चा केली.

या दौऱ्यात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.धार्मिक,सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून या भेटीला विशेष महत्त्व लाभले आहे.