उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर,काळाराम मंदिर येथे घेतले दर्शन
गोदामहाआरतीने फिटले नेत्राचे पारणे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिर आणि काळाराम मंदिर येथे घेतले दर्शन नाशिक/ ज्ञानप्रवाह न्यूज,३ फेब्रुवारी : विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने रामकुंड पंचवटी येथे गोदामहाआरती केली. गंगामाईच्या पूजनाने त्यांनी धार्मिक श्रद्धा व्यक्त केली आणि नदी स्वच्छता व पर्यावरण रक्षणासाठी जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले….