भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना धर्मादाय आयुक्त आणि राज्य शासनाची मान्यता
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३० – भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी दलित शोषित पीडित विद्यार्थ्यांकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती या शैक्षणिक संस्थेचे मुंबई, नवी मुंबई, महाड, औरंगाबाद, नांदेड, पुणे, कोल्हापूर, बेंगलोर, गया – बिहार या ठिकाणी एकूण ४३ शाळा, महाविद्यालय आणि वस्तीगृहे आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९५६ पर्यंत या संस्थेचे अध्यक्ष होते बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर
- १९५६ ला एम. बी. समर्थ हे अध्यक्ष झाले,
- १९५७ ला डी.जी जाधव,
- १९६३ ला जी.टी परमार
- १९६९ ला जीटी परमार
- १९७० ला सी एन मोहिते
- १९७२ ला आर.आर.भोळे
- १९७५ ला बी.एच.वराळे
- १९८७ ला बी बसवलिंगप्पा
- १९८७ ला के.बी. तळवटकर
- १९९० ला जस्टीस आर आर भोळे
- १९९३ ला डॉ.एस.पी.गायकवाड
(डॉ. एस पी गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर Change Report No.सधआ १/६३१०/२००१, Dated २२/०७/२००५ नुसार के एच रंगनाथन अध्यक्ष झाले) - २००१ ला के एच रंगनाथन
- २०११ ला ॲड.प्रीतमकुमार शेगावकर हे अध्यक्ष झाले (ॲड.प्रीतम कुमार शेगावकर यांच्या निधनानंतर) दि.०२.०७.२०१२ रोजी ना.रामदास आठवले हे चेअरमन झाले.
डॉ.एस पी गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे नाव शेड्युल १ वरुन हटवण्यात आले व त्यांच्या जागी के एस रंगनाथन यांचे नाव निश्चित करण्यात आले यानंतर डॉ.एस.पी.गायकवाड यांनी एम.एस.मोरे यांना चेअरमन घोषित केले एम.एस.मोरे यांच्या निधनापूर्वी डॉ.एस पी गायकवाड यांनी स्वत:ला अध्यक्षांचे वारसदार घोषित करून घेतले होते परंतु एम एस मोरे यांचा चेंज रिपोर्ट 1245/10 रिजेक्ट झाल्यामुळे ते अध्यक्ष नाहीत व ते त्यांचा वारसदार निवडू शकत नाही त्यामुळेच डॉ. एस पी गायकवाड हे स्वतःला अध्यक्ष म्हणू शकत नाहीत.
आनंदराज आंबेडकर यांनी सिद्धार्थ लॉ कॉलेज चे प्राचार्य डॉ.सुधाकर रेड्डी यांना चेअरमन म्हणून त्यांना निलंबित केले होते त्यांचे विरोधात डॉ.सुधाकर रेड्डी यांनी विद्यापीठ ट्रायब्यूनल येथे तक्रार दाखल केली होती त्यात डॉ.सुधाकर रेड्डी यांच्या बाजूने निकाल लागला. या निकालाला आनंदराज आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते मुंबई उच्च न्यायालयाच्या दि.२१.१०.२०२४ च्या आदेशात आनंदराज आंबेडकर यांना आपण संस्थेचे अध्यक्ष होऊ शकत नाही असे स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे त्यामुळे ते अध्यक्षपदावर करत असलेला दावा हा धादांत खोटा आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची निवड अधिकृत असल्याचा निकाल धर्मदाय आयुक्त कार्यालयाने यापूर्वीच दिलेला आहे.
मा.आठवले साहेब यांच्या अध्यक्षपदाला मागील १२ वर्षात कुठेही कायदेशीर आडकाठी आलेली नाही.
कोणत्याही न्यायालयात या अध्यक्ष पदास आव्हान देण्यात आलेले नाही.
त्यामुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने ना. रामदास आठवले यांच्या बाजुने दिलेला निकाल ग्राह्य मानुन राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे पीपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन ना.रामदास आठवले यांना अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे.
त्यानुसार राज्यभरातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पीपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष रामदास आठवले असुन त्यांच्या अध्यक्षतेत पीपल्स एज्यकेशन सोसायटीचे कामकाज अधिकृत चालले आहे.
रामदास आठवले यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्ती पीपल्स एज्यकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणुन शिफारसी करतील त्या शिफारसी अनाधिकृत असल्याने स्विकारु नयेत.या बाबतचे पत्र राज्य शासनाने सर्व विद्यापीठांना पाठवले आहे.
पीपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष म्हणुन रामदास आठवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे पीपल्स एज्यकेशन सोसायटीतील गटबाजीला आता पूर्णविराम मिळालेला आहे.
ना.रामदास आठवले हे पी.इ.एस चे अध्यक्ष आहेत यांच्या अध्यक्षतेखाली
- उपाध्यक्ष पद्मश्री डॉ.सुखदेव थोरात
विश्वस्त
- पद्मश्री ऍड.उज्जवल निकम,
- जस्टीस सुरेंद्र तावडे
- ॲड.बि.के. बर्वे
- डॉ.विश्वास पाटील
- डॉ.वासुदेव गाडे
- डॉ.सुनिल खापरडे
- श्री.अरविंद सोनटक्के
- प्रो.एस.एल भागवत
- डॉ.एम.व्यकंट स्वामी
- सचिव – डॉ.वामन आचार्य
- सहसचिव – डॉ.यु.एम.मस्के
- कार्यकारी समीती सदस्य – चंद्रशेखर कांबळे
अशी कार्यकारणी कार्यरत आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्यकेशन सोसायटीचे मुंबई,नवी मुंबई,महाड,पुणे कोल्हापुर,छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बेंगलोर, बुध्दगया (बिहार) या ठिकाणी अनेक शैक्षणिक संकुल आणि वसतीगृहे आहेत.
परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पी.ई.एस.या संस्थेचा मा.आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली विकास करणार आहोत.
राज्यात सर्व जिल्ह्यात जमीन मिळवून विविध महाविद्यालये सुरु करणार आहोत. राज्य बाहेर अन्य राज्यांत सुद्धा जमीन मिळवून संस्थेचा अधिक विकास करणार आहोत .
छत्रपती संभाजीनगर मध्ये मेडिकल कॉलेज सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गरीब मुलांना पुर्व प्राथमिक पासुन इंग्रजी माध्यमांचे चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. कमवा आणि शिका या तत्वावर ही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल उभे करण्याचा अध्यक्ष आठवले साहेब यांचा मानस आहे, असे पीपल्स एज्यकेशन सोसायटीचे अधिकृत अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मानस आहे असे एका पत्रकाद्वारे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी समीती सदस्य चंद्रशेखर कांबळे यांनी कळविले आहे.