नागपुरात मृत्यूनंतर काय होते हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने विद्यार्थिनीने केली आत्महत्या


suicide
नागपूरच्या धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत्यु नंतर काय होते हे जाणून घेण्यासाठी एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने तिच्या खोलीत पाहिले हाताची नस कापली. नंतर तिने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केली. इंटरनेटवर केलेल्या शोधातून हे केल्याचे समोर आले आहे. 

मयत मुलगी 12 वीची विद्यार्थिनी असून तिचे वडील आरबीआय मध्ये अधिकारी पदावर असून आई गृहिणी आहे. या मुलीचे कुटुंब छत्रपति नगर परिसरात राहतात तर मुलीचे मामा त्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहतात.या मुलीला ऑनलाइन गेमिंगची आवड होती. 

 

रविवारी रात्री ती तिच्या खोलीत झोपायला गेली नंतर खोलीत जाऊन तिने धारदार चाकूने स्वत:च्या हाताची नस कापली नंतर गळा चीरला. सोमवारी सकाळी तिचे कॉलेज मध्ये प्रेक्टिकल होते.   

सोमवारी सकाळी तिची आई 6 वाजता तिला उठवायला खोलीत गेली असता मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. आईचा आरडाओरड ऐकून सर्व तिच्या खोलीकडे धावले. या घटनेची माहिती धंतोली पोलिसांना देण्यात आली.

ALSO READ: सोलापूर मध्ये अल्पवयीन मुलाने वडिलांच्या बंदुकीने स्वतःवर झाडली गोळी
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठविले आहे. 

मुलीने आत्महत्येसाठी दगडी चाकूचा वापर केला असून हा दगडी चाक़ू दगड आणि लाकडाने बनलेला  आहे. हा चाक़ू सर्वसामान्य बाजारात सहजासहजी मिळत नाही. तिने हा चाक़ू ऑनलाइन मागवल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहिलेली होती. 

ती इंटरनेटवर पाश्चत्य संस्कृति बद्दल शोधायची. तिने मृत्यु नंतर काय होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असून मृत्यूला कवटाळले. पोलिसांनी तिचा मोबाईल जप्त केला असून पोलिस पुढील शोध घेत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.  

Edited By – Priya Dixit 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top