भारतीय प्रजासत्ताक दिन वर्धापनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.25:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक व नयन रम्य विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल सभा मंडप, मंदिरातील आतील व बाहेरील बाजूस, श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी तिरंग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.याशिवाय श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, श्री संत तुकाराम भवन,श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास,वेदांता व्हिडिओकॉन भक्त निवास इत्यादी ठिकाणी देखील रोषणाई करण्यात आली आहे.

यासाठी सुमारे एलईडी बल्ब 100 माळा,25 फोकस व 100 ट्यूब चा वापर करण्यात आला आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. संपूर्ण रोषणाई मंदिर समितीमार्फत करण्यात आली असून,याची जबाबदारी विद्युत विभाग प्रमुख शंकर मदने यांच्याकडे आहे.यासाठी सात कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून केलेली ही तिरंगा रंगाची सजावट भाविकांसाठी पर्वणी ठरत आहे.