पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि 23:-राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
तत्पुर्वी पालकमंत्री गोरे यांनी पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराचे जतन व संवर्धनाच्या कामांबाबतची माहिती घेतली.याप्रसंगी आमदार समाधान आवताडे,माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर,माजी आमदार प्रशांत परिचारक,माजी आमदार राम सातपुते,प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे,विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले,गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव,मंदीर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


