लोकमान्य विद्यालय पंढरपूर सुवर्ण महोत्सवी वर्षातील स्नेहमेळावा

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरलातील सर्वात जुने लोकमान्य विद्यालयामधील 1975 सालच्या जुन्या अकरावी (s.s.c.)ची परीक्षा दिलेले विद्यार्थी 1975- 2025 पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त एकत्रित जमले होते.सोलापूरात असलेल्या त्यांच्या वर्ग मित्र मैत्रिणींनी या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.

सोलापूर पुणे रोडवरील पिकनीक पाँइंट या कृषी पर्यटन केंद्रामध्ये हा स्नेहमेळावा पार पडला.यासाठी कराड,ठाणे ,पुणे, पंढरपूर अशा विविध ठिकाणाहून मित्र मैत्रिणी जमले होते.

सकाळी नऊ वाजता वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले सर्व मित्र मैत्रिणी एकत्र जमले.गरमागरम हुरडा पार्टीचा मनमुराद आनंद घेतला.एकत्र जमून मुक्तपणे गाण्यांच्या तालावर गप्पा गोष्टीत रंगून गेले.

विद्या कुलकर्णी /कवयित्री भूमिका हिच्या वसुंधरा कवितेचे अनावरण आमचे सहपाठी ज्ञानेश्वर जळगावकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.सर्वांनी संगीत खुर्ची खेळाचा आनंद घेतला.मग स्पेशल सोलापूरी जेवणाचा स्वाद घेतला.

चहापानाने कार्यक्रमाची सांगता पुन्हा लवकरच भेटण्याचे ठरवत झाली.सोलापूरी शेंगदाण्याची खमंग चटणी व सेंद्रीय गूळ घेऊन सर्वजण आठवणींचा सुगंध बरोबर घेऊन नवीन उर्जेसह घरी परतले.
