नवेगाव धरण आणि चांदपूर येथे नवीन पर्यटन निवास स्थानांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उदघाटन



विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातील एमटीडीसीचे नवेगाव धरण पर्यटन निवासस्थान नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळ कायमस्वरूपी बांधण्यात आले असून हे पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. या पर्यटन निवासस्थानाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्याचे पर्यटनमंत्री इंद्रनील नाईक, सचिव जयश्री भोज, पर्यटन विकास महामंडळाचे प्रशासकीय संहलक मनोज कुमार सूर्यवंशी उपस्थित होते. 

नवेगाव धरण हे आदर्श पर्यटनस्थळ आहे. हे घनदाट जंगल गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेस गोंदियापासून 65 किमीच्या अंतरावर आहे. येथे राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे. जंगलांनी व्यापलेल्या या उद्यानाचे क्षेत्रफळ 165 चौरस किमी आहे. येथे तलाव आणि वनक्षेत्र हे पक्ष्यांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. 

 

नवेगाव धरण हे एक आदर्श पर्यटन स्थळ आहे जिथे आपण बोटिंग करू शकतो, पक्षी पाहू शकतो आणि आसपासच्या जंगलात विविध प्राणी पाहू शकतो. येथील प्राचीन आणि शांत वातावरण पर्यटकांना निसर्गाच्या जवळ आणते.

हे सर्व सुविधांनी सज्ज आहे. या ठिकाणी पर्यटकांच्या निवासासाठी महामंडळाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 21 कोटी रुपयांच्या निधीतून चांदपूर नावाचे पर्यटक निवास सुरु केले. या ठिकाणी स्विमिंगपूल, रेस्टोरेंट, 8 बेडची डॉर्मिटरी सारख्या सुविधा देण्यात आल्या आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रशासकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली महाप्रशासक चंद्रशेखर जैस्वाल, मॅपविम मुंबईचे अधीक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे यांनी मार्गदर्शन केले. 

Edited By – Priya Dixit

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top