पत्रकार सुरक्षा समिती कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी रामचंद्र सरवदे फेर नियुक्त
सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा,राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती, राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी,पत्रकारांसाठी आरोग्य व विमा योजना,घरकुल योजना, राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट मिळावी ,खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी, राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राच्या जेष्ठ व वयोवृद्ध संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन इत्यादी विषया सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन,उपोषणे निवेदने त्याचबरोबर राज्यसरकारकडे पत्रव्यवहार करत असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

रामचंद्र सरवदे यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या लढ्यात सहभागी होऊन पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.रामचंद्र सरवदे यांनी यापूर्वी देखील पत्रकार सुरक्षा समितीच्या कार्यकारी प्रदेशाध्यपदी काम पाहिलं असून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या अडीअडचणी संदर्भात ते नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पत्रकार सुरक्षा समिती नूतन पदाधिकारी 2025 साठी रामचंद्र सरवदे यांची कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी फेर नियुक्ती करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते ओळखपत्र,नियुक्तीपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा संघटक आन्सर तांबोळी (बी एस ), जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार,मोहोळ तालुकाध्यक्ष बंडू तोडकर ,सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे, दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद,दैनिक अब तक चे संपादक प्रसाद जगताप, दैनिक लोक प्रधान चे कार्यकारी अस्लम शेख, संपादक प्रवीण राठोड, राजाभाऊ पवार ,रक्षंदा स्वामी, योगिनाथ स्वामी ,अरुण सिगगिद्दी, राजू वग्गू,शाहीद शेख,तानाजी माने,किसन शिंदे,कलीम शेख, इम्रान अत्तार ,वसीम राजा बागवान,सिद्राम येलदी ,मुन्ना पठाण,युनूस अत्तार,लतीफ शेख,डी डी पांढरे,असलम नदाफ,रियाज हंजगीकर ,इस्माईल शेख, मिलिंद प्रक्षाळे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
