महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस शकील मौलवी यांच्या वतीने EVM विरोधात स्वाक्षरी मोहीम अभियान
भाजपला सत्तेचा माज,भाजप नेत्यांकडून महापुरुषांचे सातत्याने अपमान,मुंबईत काँग्रेस कार्यालयावर हल्ल्याचा निषेध :- चेतन नरोटे

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज –महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस शकील मौलवी यांच्यावतीने विजापूर वेस येथे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत या पुढच्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या भागातील जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत स्वाक्षरी करून EVM ला आपला विरोध दर्शविला.

यावेळी शहरातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन चेतन नरोटे आणि शकील मौलवी यांनी केले आहे.
या स्वाक्षरी मोहिमेच्यावेळी माजी महापौर आरिफ शेख, मैनुद्दीन शेख,रुस्तुम कंपली, अंबादास गुत्तिकोंडा,लतिफ शेख,एन के क्षीरसागर, प्रमिला तुपलवंडे,हेमाताई चिंचोलकर, रजाक कादरी,नूर अहमद नालवार, रफिक चकोले, मैनुद्दीन शेख चेअरमन, कलीम तुळजापुरे, करिमुनिस्सा बागवान, तिरूपती परकीपंडला, संजय गायकवाड, सुनील सारंगी, शोभा बोबे, यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.