सोलापुरात IIT आणि IIM सारख्या संस्था स्थापन करण्याची खा.प्रणिती शिंदे यांची केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी

सोलापुरात IIT आणि IIM सारख्या संस्था स्थापन करण्याची खासदार प्रणिती शिंदे यांची केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ डिसेंबर २०२४- खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM आयआयएम) सारख्या प्रमुख संस्थांची स्थापना करण्याची विनंती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनाद्वारे अशी मागणी केली की, सोलापूरला समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा आहे.येथे आयआयटी आणि आयआयएम कॅम्पसची स्थापना केल्याने विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. सोलापूरचे मध्यवर्ती स्थान आणि औद्योगिक क्षमता, शिक्षणास पोषक वातावरण यामुळे या प्रतिष्ठित संस्थांसाठी सोलापूर योग्य पर्याय आहे. सोलापूरसारख्या टियर-2 शहरात आयआयटी आणि आयआयएम स्थापन केल्याने शहरी-ग्रामीण शैक्षणिक दरी कमी होण्यास मदत होईल आणि दर्जेदार शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध होतील. तसेच या संस्थांमध्ये सोलापुरची शैक्षणिक आणि आर्थिक स्थैर्य वाढण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top