Parbhani Violence :परभणीत अचानक हिंसाचार उसळला, महाराष्ट्रात हिंसाचार का झाला


parbhani violence
परभणीत अचानक हिंसाचार उसळला. संतप्त लोकांनी जाळपोळ केली आणि परिसरात तोडफोड केली संविधानाच्या अवमानावरून सुरु झालेल्या या वादाने हिंसाचाराचे रूप घेतले.संविधानच्या अवमान करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी आंदोलक करत आहे. 

परभणीत परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली असून आंदोलकांनी रस्त्यावर उतरून हिंसक निर्दशने सुरु केली पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक कारवाई केली आहे. पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयंत्न केला. 

https://platform.twitter.com/widgets.js

प्रकरण काय आहे? 

परभणीत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली असून हे प्रकरण संपूर्ण परिसरात वाऱ्या सारखे पसरले. हा सँविधानाचा अपमान केला असून अपमान करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलक करत आहे.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड आणि संविधानाची अवहेलना करण्यासारखे लाजिरवाणे कृत्य परभणीत जातीयवादी मराठा समाजकंटकांनी केल्याचे बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
 

हा पुतळा परभणी रेल्वे स्थानकाच्या बाहेर बसवण्यात आला असून काही समाजकंटकांनी त्याची तोडफोड केली.याच्या निषेधार्थ लोकांनी जाळपोळ आणि दगडफेक सुरु केली.हिंसाचार उसळताना पाहता परभणी शहरात बंदची घोषणा करण्यात आली आहे. 
 

आरोपींना 24 तासाच्या आत अटक करण्याची मागणी आंदोलक करत आहे. तसेच त्यांच्या फाशीची मागणी देखील करत आहे. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. 

Edited By – Priya Dixit

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top