पीएम मोदींना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अजमेर मधून अटक


modi
Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. आता याप्रकरणी एका गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई वाहतूक पोलिस हेल्पलाइनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या राजस्थानमधील अजमेर येथून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. एका अधिकारींनी सोमवारी ही माहिती दिली.

ALSO READ: मुंबई : कुर्ला येथे अनियंत्रित बसने अनेक वाहनांना दिली धडक, 6 ठार, 20 गंभीर जखमी

तसेच अधिकारींनी सांगितले की, झारखंडचा  रहिवासी मोहम्मद नदीम बेग मिर्झा याला वरळी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. “आमच्या तपासात समोर आले आहे की मिर्झा एका खाजगी कंपनीत काम करतो. तो नशेत कामावर आल्यामुळे त्याच्या बॉसने त्याला घरी जाण्यास सांगितले होते, यामुळे तो नाराज होता. रागाच्या भरात त्याने शनिवारी मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइनवर पंतप्रधानांविरोधात धमकीचा संदेश पाठवला. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “तांत्रिक सहाय्याने, त्याला अजमेर येथून पकडण्यात आले आणि अटक करण्यात आली,” असे अधिकारी म्हणाले.तसेच  त्याची चौकशी करण्यात येत आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top