मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने 7 जण अडकले


landslides
Tamil Nadu News: तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे तिरुवन्नमलाई येथे भूस्खलन झाले आहे. ढिगाऱ्याखाली सात जण अडकले असून त्यात तीन मुलांचा सहभाग आहे. एनडीआरएफचे जवान हायड्रोलिक लिफ्टच्या मदतीने बचाव कार्यात गुंतले आहे. 

 

मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे तिरुवन्नमलाई येथे भूस्खलन झाले आहे. या ढिगाऱ्याखाली सात जण अडकल्याची माहिती मिळाली असून त्यात तीन मुलांचा समावेश आहे. तसेच बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अन्नमलय्यार टेकडीच्या खालच्या उतारावर असलेल्या घरांवर मुसळधार पावसानंतर मोठे भूस्खलन झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यात सुमारे 7 जण अडकले आहे. याप्रकरणी रविवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डी भास्कर पांडियन आणि पोलीस अधीक्षक एम. सुधाकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. शहरात मुसळधार पाऊस सुरू असूनही अधिकाऱ्यांकडून बचावकार्य सुरू आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, टेकडीच्या खालच्या उतारावर असलेल्या झोपड्यांवर मोठा दगड पडला होता. घरांमध्ये 5 ते 7 लोक अडकले असण्याची शक्यता आहे.

Edited By- Dhanashri Naik 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top