ईव्हीएम घोटाळ्याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार : दिलीप धोत्रे
भाजपाने ईव्हीएम घोटाळा करून छोट्या पक्षांना संपवण्याचा घाट घातला; मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा पत्रकार परिषदेत आरोप
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- भारतीय जनता पार्टीने ईव्हीएम घोटाळा करून छोट्या पक्षांना संपवण्याचा घाट घातला असल्याचा आरोप मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत केला आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात दिलीप धोत्रे हे मनसेचे उमेदवार होते.दोन महिन्यांपूर्वी राज्यातील पहिली मनसेची उमेदवारी त्यांना जाहीर झाली होती.उमेदवारी जाहीर झाल्या नंतर तीन महिने त्यांनी मतदार संघात जोरदार प्रचार केला होता.निवडणुकी दरम्यान दिलीप धोत्रे यांना अनेक समाज घटकांनी पाठिंबा दिला होता.मात्र दिलीप धोत्रे यांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी मते मिळाल्याने यामध्ये काहीतरी घोळ असल्याचा संशय दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केला आहे.
मतमोजणीच्या दिवशी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ईव्हीएम मशीनमधील स्लीपची मोजणी करण्यात यावी असा तक्रारी अर्ज केला होता.मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवघ्या काही मिनिटातच त्यांचा अर्ज फेटाळला. राज्यभरातही असे अनेक प्रकार दिसून आल्याने ईव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयात मनसे नेते दिलीप धोत्रे याचिका दाखल करणार असून ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याच्या मतावर ते ठाम आहेत.
