हिंदूंनी एक बोट दाबलं तर सरकार आलं,वज्रमूठ केली तर हिंदु राष्ट्र निश्चित- हिंदु जनजागृती समिती

हा तर हिंदूंच्या संघटित शक्तीचा विजय..

हिंदूंनी एक बोट दाबलं तर सरकार आलं; वज्रमूठ केली तर हिंदु राष्ट्र निश्चित- हिंदु जनजागृती समिती

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23.11.2024- लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी झालेली चूक सुधारून हिंदूंनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत मतदान केले.परिणामी राज्यात पुन्हा हिंदुत्ववादी सरकार सत्तास्थापन करत आहे. हा व्होट जिहादचा पराभव असून हिंदूंच्या संघटित शक्तीचाच विजय आहे, हेच दिसून येत आहे.आज हिंदूंनी एक बोट दाबलं, तर सरकार आलं आहे. जर हिंदूंनी मिळून वज्रमूठ केली, तर हिंदु राष्ट्र का येणार नाही? निश्चितच हिंदु राष्ट्र येईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी १७ कलमी मागणीपत्र महाविकास आघाडी सरकारला दिले होते आणि काँग्रेसने त्यांचे ते पत्र स्वीकारल्याने सर्व मुसलमानांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन नोमानी यांनी केले होते.या १७ मागण्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्यासारख्या हिंदुविरोधी मागण्या होत्या.महाराष्ट्रात जर हिंदूंच्या सुरक्षेवर आघात होणार असेल,तर तो आघात हिंदूंनी मतपेटीच्या माध्यमातून उलथावून लावला आहे.देशात आणि राज्यात हिंदूंच्या सुरक्षेसाठी हिंदुहिताचे सरकार हिंदूंनी निवडून दिले आहे,असे लक्षात येते.

महाराष्ट्रात सुराज्य आणण्यासाठी संस्कृतीनिष्ठ, सुरक्षितता आणि समृद्धी यांना प्राधान्य देणार्‍या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन समितीने सुराज्य अभियाना द्वारे केले होते. अनेक हिंदु संघटनांनी मतदान जागृती मोहिमा राबवल्या होत्या.परिणामी हिंदु मतदार मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडला, मतदानाची टक्केवारीही वाढली आणि राज्यात हिंदुत्वनिष्ठ अन् राष्ट्रनिष्ठ विचारांचे सरकार बहुमताने येणार आहे.यासाठी अनेक साधू- संत, हिंदुत्वनिष्ठ संघटना, आध्यात्मिक संस्था, सामाजिक संस्था आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी संघटितपणे मेहनत घेत जागृती केली होती.त्यामुळे हा हिंदूंच्या संघटित शक्ती विजय आहे.या विजयाबद्दल आम्ही आगामी हिंदुत्ववादी सरकारचे अभिनंदन करत आहोत,असेही समितीने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top