कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या खेळाडूंची ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वेस्ट झोन स्पर्धेसाठी निवड
अंतर महाविद्यालयीन एअर रायफल व एअर पिस्टल शुटिंग स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाचे वर्चस्व

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/११/२०२४- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर महाविद्यालयीन १० मीटर एअर रायफल व एअर पिस्टल शुटिंग मुले व मुली स्पर्धेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाने वर्चस्व निर्माण केले.ही स्पर्धा व्ही.जी. शिवदारे महाविद्यालय सोलापूर येथे नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत विद्यापीठातील एकूण बारा महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता.

१० मीटर एअर पिस्टल शुटिंग मुली यामध्ये कु.ऋतुजा धुमाळ एम.कॉम.भाग १ या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर १० मीटर एअर रायफल शुटींग मुले यामध्ये सार्थक बारले बी.ए.भाग२ या विद्यार्थ्यांने तृतीय क्रमांक प्राप्त केला.या खेळाडूंची चंदीगड पंजाब येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वेस्ट झोन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याचे रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन संजीव पाटील, प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे,महाविद्यालय विकास समिती मधील सर्व सदस्य, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य डॉ.तुकाराम अनंतकवळस,उपप्राचार्य प्रा.राजेश कवडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षचे समन्वयक डॉ.अमर कांबळे,स्वायत्त महाविद्यालय समन्वयक डॉ.मधुकर जडल यांनी अभिनंदन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.विठ्ठल फुले,प्रा.मनोज खपाले व प्रा.अनिल परमार यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन क्षेत्रात सिनिअर विभागातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी विशेष कौतुक केले.
