निवडणूक प्रक्रियेतील सुलभतेसाठी चक्रीका ॲपचा वापर बंधनकारक

निवडणूक प्रक्रियेतील सुलभतेसाठी चक्रीका ॲपचा वापर बंधनकारक

पंढरपूर,दि.18:-निवडणूक प्रक्रियेत सुलभता आणि कार्यक्षमता वाढण्यासाठी चक्रीका ॲपचा वापर बंधनकारक असून निवडणूक नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी गुगुल प्ले स्टेाअरमधून चक्रीका ॲप डाऊन करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सचिन  इथापे यांनी केले आहे.
      
चक्रीका ॲप’द्वारे मतदान कर्मचाऱ्यांना मतदारांची तपशीलवार माहिती,मतदान केंद्रांचे निर्देश आणि प्रक्रियेतील आवश्यक सूचना सहज मिळतात. मतदानाच्या वेळी उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यासाठी तसेच मतदानाचे अहवाल पाठविण्यासाठी हे ॲप उपयुक्त असून निवडणूक  नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ या ॲपचा वापर करावा असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी श्री.इथापे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top