सराईत वाळु तस्कर कृष्णा नेहतराव एम.पी.डी.ए कायद्यांर्गत एका वर्षासाठी स्थानबध्द

सराईत वाळु तस्कर कृष्णा नेहतराव एम.पी.डी.ए कायद्यांर्गत एका वर्षासाठी स्थानबध्द

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/११/२०२४- पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीपणे विक्री व्यवसाय करणारा वाळु तस्कर सराईत गुन्हेगार कृष्णा सोमनाथ नेहतराव रा. जुनी पेठ कोळी गल्ली, पंढरपुर ता.पंढरपुर जि.सोलापुर हा अवैधरित्या वाळु चोरी करणे, ती विक्री करणे सोयीचे व्हावे या करीता दहशत माजवण्याकरीता वाळुचे कारणावरून जिवघेणे हल्ले करणे तसेच पंढरपूर शहर व पंढरपूर शहरा लगतच्या परिसरातील लोकांना दमदाटी, मारहाण करून गौण खनिज (वाळु) चोरी करणे असे गुन्हे करण्याची त्यास सवय होती जे की, भारतीय न्याय संहिता २०२३ मधीत प्रकरण ६ व १७ मधील अपराधी स्वरूपाची कृत्ये असून सदरची कृत्ये करण्याची त्यास सवय जडली होती.एक वाळु तरकर म्हणुन त्याने स्वतःला सिध्द केले होते .त्याचे विरूध्द अनेकवेळा वाळु व्यवसायाबद्दल गुन्हे दाखल होवुन त्यामध्ये अटक करण्यात आली होती. परंतु तो सदर गुन्ह्यात जामीन मिळवुन अवैध वाळु व्यवसाय अव्याहतपणे सुरूच ठेवत होता.

तो कायद्याला जुमानत नव्हता म्हणुन सराईत वाळु तस्कर गुन्हेगार कृष्णा सोमनाथ नेहतराव रा. जुनी पेठ कोळी गल्ली, पंढरपुर ता.पंढरपुर जि. सोलापुर याचेविरूध्द पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभ‌ट्टी व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, द्रकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती,अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती, वाळू तस्कर यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे विषयीचा कायदा सन १९८१ मधिल कलम ३(१) अन्वये स्थानबध्द करणेबाबतचा प्रस्ताव सोलापुर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांचे मार्फत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सोलापुर यांना पाठविणेत आला होता.त्या अनुशंगाने स्थानबध्दतेचे कामकाज चालवुन त्यांनी एम.पी. डी.ए कायद्यांर्गत स्थानबध्दतेचे आदेश पारीत केलेने त्यास ताब्यात घेवुन पुणे येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षाकरीता स्थानबध्द करणेत आले असुन आणखीन अशा प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभुमी असणार्या गुन्हेगारांवर कारवाई करणेची प्रक्रिया चालु आहे.

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर,पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले,पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि.आशिष कांबळे,स.पो.फौ. विजय गायकवाड, पोलीस नाईक सचिन इंगळे तसेच स.पो.फौ.शरद कदम,स.पो.फौ. राजेश गोसावी, पो.हवा सुरज हेंबाडे,सिरमा गोडसे,सचिन हेंबाडे,प्रसाद औटी, दादा माने, पलुसकर, पो.का.शहाजी मंडले, समाधान माने, निलेश कांबळे, बजरंग बिचकुले, अनिस शेख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top