लढा आणि निवडून या, शिवसैनिकांची खंबीर साथ राहील
शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या काँग्रेसचे चेतन नरोटे यांना शुभेच्छा
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/११/२०२४: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही लढा आणि निवडून या आमच्या शिवसैनिकांची तुम्हाला खंबीर साथ आणि पाठबळ राहील, अशा शब्दात शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापूर शहर मध्य मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना शुभेच्छा दिल्या.

महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना उबाठाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सोलापुरात आले असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोलापूर शहर मध्य मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांनी सदिच्छा भेट घेतली. त्याप्रसंगी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नरोटे यांनी पुष्पगुच्छ देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे दक्षिणचे उमेदवार अमर पाटील , पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

तुम्ही लढा आणि निवडूनही या ! आमच्या शिवसैनिकांची तुम्हाला खंबीर साथ आणि पाठबळ राहील.राज्यात महागाई,बेरोजगारी आणि इतर प्रश्न सामान्य नागरिकांना भेडसावत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता निश्चित येणार आहे, अशा शब्दात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नरोटे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
