मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी घेतली प्रचारात आघाडी
मनसेच्या प्रचार सभांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारसभांना मंगळवेढा तालुक्यातील विविध ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.ठिकठिकाणी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे.

शनिवारी त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील देगाव, मल्लेवाडी, घरनिकी, मारापूर, गुंजेगाव, रेवेवाडी, पडळकरवाडी, लोणार, ममदाबाद,शिरनांदगीद या गावांमध्ये मनसेच्या वतीने सभा घेण्यात आली.
मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केलेल्या कामाच्या जोरावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील पहिली मनसेची उमेदवारी जाहीर केली होती.यानंतर मतदार संघात धोत्रे यांनी कार्यक्रमांचा धडाका लावला होता.

गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी झाले आहेत.निवडणूक प्रचाराला सुरुवात झाल्या नंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा घेऊन त्यांनी प्रचारातही त्यांनी आघाडी घेतली आहे.
राजकारणाबरोबरच त्यांनी समाजकारणा मध्ये मोठे योगदान दिले आहे.मतदार संघातील नागरिकांना देव देवतांचे दर्शन घडावे यासाठी विविध यात्रेचे आयोजन करून हिंदू बांधवांना देव देवतांचे दर्शन घडवले होते.यानंतर त्यांनी मुस्लिम बांधवांसाठी अजमेर यात्रा आणि बौद्ध बांधवांसाठी नागपूर दीक्षाभूमी यात्रेचे आयोजन करून दर्शन घडवले होते.कायमचं सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे नेते आहेत. यामुळे आगामी निवडणुकी विजय मिळवतील असे बोलले जात आहेत.
