शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान तर्फे वसुबारस साजरी

शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान तर्फे वसुबारस साजरी

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने यावर्षी दीपावली सणाच्या औचित्य साधून दीपावलीच्या प्रथम दिवस वसुबारस या दिवशी श्री. केशव गोशाळा शेगाव दुमाला येथील गो गोशाळा येथे गौमातेचे पूजन व त्यांना चारा देऊन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास गोशाळेचे अध्यक्ष नंदकिशोर मर्दा व सदस्य किसगोपाल भट्टड तसेच तेथील व्यवस्थापक श्यामजी कुदाळ यांच्यासह सदरच्या कार्यक्रमासाठी शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुन्नागिरी गोसावी,वृंदादेवी गोसावी- उपाध्यक्ष,अनिष गोसावी,अंशुल गोसावी ,अनमित्रा गोसावी व शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top