जनसामान्यांच्या हितासाठी दिलीप धोत्रे यांनी काम केले असल्याने त्यांना विजयी करा असे आवाहन

जनसामान्यांच्या हितासाठी दिलीप धोत्रे यांनी काम केले असल्याने त्यांना विजयी करा

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी केला निर्धार

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/१०/२०२४- पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांना विजयी करण्याचा मतदार संघातील नागरिकांनी निर्धार केला आहे.

आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे दिलीप धोत्रे यांनी मागील अनेक वर्षांपासून मतदार संघातील नागरिकांचे हित डोळ्या समोर ठेवून काम केले आहे.पंढरपुरातील नागरिकांचा वाढीव कर माफ करणे,हिंदू, मुस्लिम स्मशानभूमी दुरुस्ती,रस्ते खड्डे मुक्त करणे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करणे, बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देणे, महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग उभा करून देणे याचबरोबर कोरोना काळात त्यांनी रुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत यासाठी पल्स कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली होती तसेच एकही नागरिक उपाशी झोपणार नाही याची काळजी त्यांनी घेतली होती.

त्यामुळे दिलीप धोत्रे यांच्याकडे सर्वसामान्यांना मदत करणारे नेतृत्व म्हणून पाहिले जाते.सध्या पंढरपूर मंगळवेढा विधान सभा मतदार संघात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्ते, वीज, पाणी आणि विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी तसेच बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी लवकरात लवकर एमआयडीसी उभा करणे,महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांना निवडून आणण्याचा निर्धार मतदार संघातील नागरिकांनी केला असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top