राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड
पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते सुधीर भोसले यांना निवडीचे पत्र प्रदान
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद पवार निष्ठ अशी ओळख असलेले राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष सुधीर भोसले यांच्यावर राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी जिल्हा संघटकपदाची जबाबदारी सोपविली आहे.
सोलापूर पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत सुधीर भोसले यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.सोलापूर येथे आयोजित पक्षाच्या बैठकीस माजी महापौर महेश कोठे,सांगली व्यापार उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण,पंढरपूर तालुकाध्यक्ष संदीप मांडवे,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलाब मुलाणी,विजय काळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधीकारी उपस्थित होते.

सुधीर भोसले यांनी २०१६ पासून राष्ट्रवादी कॉग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे .पक्षाच्या ध्येयधोरणे आणि विचारधारेचा प्रचार प्रसार करण्यासाठी ठोस भूमिका बजावली आहे.
या निवडीनंतर बोलताना नूतन जिल्हा संघटक सुधीर भोसले म्हणाले कि,देशाचे नेते शरदचंद्र पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विचारांचा वसा,पक्षाची तत्वे व ध्येयधोरणे तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू.आगामी विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,खासदार धैर्यशील मोहिते पाटील, उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांच्यासह पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शनाखाली जिल्हा संघटक म्हणून महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी परिश्रम घेऊ.